Saturday, February 18, 2012

कर्नाटक शिवजयंती 2012

कर्नाटक सरकार साजरी करणार शिवजयंती
- वृत्तसंस्था
Friday, February 10, 2012 AT 01:15 AM (IST)
बेळगाव - संपूर्ण राष्ट्राचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या वर्षापासून कर्नाटक शासनातर्फे साजरी करण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला. आमदार अभय पाटील व आमदार संजय पाटील हे सहा महिन्यांपासून त्यासाठी प्रयत्न करीत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, मुख्यमंत्री सदानंद गौडा व कन्नड सांस्कृतिक विभागाचे मंत्री गोविंद कार्जोळ यांनी त्याला मंजुरी दिली आहे.

यापुढे प्रत्येक जिल्ह्यात सरकारी पातळीवर शिवजयंती साजरी होणार आहे. बेळगावात शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. यापुढे त्याला सरकारी हातभार लागणार असल्याने कार्यकर्त्यांच्या उत्साहात आणखी भर पडणार आहे.

मुख्यमंत्री गौडा म्हणाले, ""छत्रपती शिवराय हे राष्ट्रपुरुष आहेत. ते कोणत्या एकाच प्रदेशाचे म्हणून वाद निर्माण करणे योग्य नाही. काही दिवसांपूर्वी दावणगेरी येथे त्यांचा अश्‍वारूढ पुतळा उभारला. राज्यातील तीसही जिल्ह्यांत शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदापासून त्याची अंमलबजावणी होईल.'

No comments: