Saturday, February 18, 2012

सोलापूर शिवजयंती २०१२


शिवजयंती साजरी न करणा-या शासकीकार्यालयांंवर कारवाईची मागणी

(Updated on 07/02/2012 0 : 44 IST)
शिवजयंती साजरी न करणा-या शासकीकार्यालयांंवर कारवाईची मागणी
सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये व शाळा महाविद्यालयांमध्ये शासकीय नियमानुसार १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करण्याचे आदेश पारीत करावेत. तसेच शिवजयंती साजरी न करणा-यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी पराग सोमण यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, शासकीय नियमानुसार १९ फेब्रुवारी रोजी शासकीय सुट्टी देण्यात आली आहे. तरीही त्यादिवशी शिवजयंती साजरी केली जात नाही.
त्यामुळे अशा शाळा, महाविद्यालये व शासकीय कार्यालयांवर कायदेशीर कारवाई न झाल्यास संभाजी ब्रिगेड तर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देताना शहराध्यक्ष महेश सावंत, विजय भोसले, सचिन गायकवाड, नानासाहेब भोसले, विकी सूर्यवंशी, किशोर मोरे, सुरज मोरे, अंबादास माने आदी उपस्थित होते.

शिवजन्मोत्सव समितीची बैठक
मध्यवर्ती शिवजयंती महोत्सव समिती अकलूजतर्फे दि. १९ रोजी शिवाजी महाराज यांच्या जयंती महोत्सव साजरा करण्यासाठी नियोजनाची बैठक मध्यवर्ती शिवजयंती महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष संग्रामसिंह जयसिंह मोहिते-पाटील यांनी बोलावली आहे. ही बैठक १४ फेबु्रवारी रोजी सायंकाळी ५.०० वाजता ग्रामपंचायत कार्यालय अकलूज येथे होईल. मध्यवर्ती नवरात्र महोत्सव, मध्यवर्ती गणेशोत्सव त्याचप्रमाणे मध्यवर्ती शिवजयंती महोत्सव समितीमार्फत लहान मुलांना किल्ले बनविणे, शिवाजी महाराजांचा संदेश घराघरात जिवंत ठेऊन राष्ट्रभक्ती जागृत ठेवण्याचे काम हे मंडळ दरवर्षी करत असते. तरी शिवप्रेमींनी या बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्षांनी केल्याचे पत्र दिले आहे.

No comments: