Sunday, February 19, 2012

अहमदनगर शिवजयंती २०१२

जिजाऊंनी शिवरायांना घडविले : महापौर शिंदे

प्रतिनिधी । नगर

आई जिजाऊ यांनी छत्रपती शिवरायांना घडविले. जिजामाताच शिवरायांच्या गुरू आणि मार्गदर्शिका आहेत. आईच्या चांगल्या संस्कारामुळे सर्व जातीधर्मांना सामावून घेऊन शिवरायांनी राज्य निर्माण केले. जिजाऊंच्या आदर्श विचारांचे आचरण सध्याच्या आईने करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महापौर शीला शिंदे यांनी केले.

शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी नगरसेवक निखिल वारे, दिलीप सातपुते, माजी नगराध्यक्ष शंकरराव घुले, नितीन शेलार, माधव मुळे, रार्जशी शितोळे, दशरथ शिंदे, जालिंदर बोरुडे, संगीता खरमाळे आदी उपस्थित होते.

संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिवजयंती उत्सवानिमित्त येथील भिस्तबाग चौक, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मार्ग, सावेडी येथे दि. 17, 18 व 19 रोजी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शुक्रवारी प्रसिद्ध इतिहास संशोधक प्रा. र्शीमंत कोकाटे म्हणाले, भारतासारखा इतिहास इतर कुठल्याही देशाला नाही. समाजापुढे आपला इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडला जात आहे. या देशात आतापर्यंत अनेक शास्त्रज्ञ होऊन गेले आहेत. थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फु ले यांनी हिराबाग, पुणे यैथे शिवजयंती सुरूकेली. बहुजन यांचा इतिहास वाचा म्हणजे या गोष्टी समजतील.

No comments: