Saturday, February 18, 2012

लातूर शिवजयंती २०१२

मुस्लिम बांधव साजरी करणार शिवजयंती औसा येथील आदर्श उदाहरण

लातूर। दि. १८ (प्रतिनिधी)

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात ५७ टक्के मुस्लिम सैनिक होते. चार अंगरक्षक, तोफखाना प्रमुख, आरमार प्रमुख, अशा महत्वाच्या पदावरही मुस्लिम सैनिक होते. त्यामुळे औश्यात मुस्लिम समाजबांधवांकडून शिवजयंती साजरी करण्यात येत असल्याची माहिती मुस्लिम समाज सार्वजनिक शिवजयंती महोत्सव औसाचे कार्याध्यक्ष रियाज पटेल यांनी लातूर येथे शनिवारी पत्रपरिषदेत दिली.

मुस्लिम समाज सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने औसा येथे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता औसा बसस्थानकासमोर ध्वजारोहण व प्रतिमा पूजन करण्यात येईल. २0 रोजी सायंकाळी ७ वाजता नागपूर येथील प्रा. जावेद पाशा यांचे ‘बहुजनांच्या कल्याणासाठी शिवराज्य’ या विषयावर व्याख्यान होईल. अध्यक्षस्थानी महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. मुजाहीद शरिफ राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून मोहसीन खान, अँड. गोविंद सिरसाठ, खुशालराव जाधव,कामाजी पवार उपस्थित राहणार असल्याचे रियाज पटेल म्हणाले. पत्रपरिषदेस अँड. शहानवाज पटेल, अँड. फेरोज पठाण, मुजफ्फरअली इनामदार, सुलतान बागवान, ईस्माईल शेख, हकिम बागवान, माजीद काझी, चाँद पटेल उपस्थित होते.


सार्वजनिक शिवजयंती महोत्सव

Updated on : 11/02/2012 23 : 6

प्रतिनिधी उदगीर : प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची ३८२ वी जयंती दि.१९ फेब्रुवारी २०१२ रोजी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अशोक पाटील एकंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात येणार आहे. गेल्या पाच वर्षापासून शिवजयंतीचे आयोजन करण्यात येत असून मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी वेशभूषा, पोवाडे, शिवजयंतीवर आधारीत गीते सादर केली जाणार आहेत. कार्यक्रमात उंट, घोडे, लेझिमपथक, झांज पथक, झेंडा पथक, वासुदेव, आराधी, गोंधळी, पोतराज मसनजोगी यांचा सहभागाने देखाव्यासह शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार आहे. उदगीर शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये, तांत्रिक प्रशिक्षण संस्था, संगीत विद्यालय यांनी सहभागी होण्याचे आवाहन शिवजयंती महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष प्रा.व्ही.एस. कणसे यांनी केले आहे.

No comments: