Saturday, February 18, 2012

वाशीम शिवजयंती २०१२

शिवजयंती महोत्सव आणि मोटारसायकल फेरी
वाशीम / वार्ताहर

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने रविवारी शिवजयंती महोत्सव आयोजित करण्यात आल्याची माहिती समितीचे सचिव व मराठा सेवा संघाचे केंद्रीय सदस्य सुभाष गायकवाड यांनी दिली. यानिमित्ताने वाशीम शहरातून मोटर सायकल फेरी व व्याख्याने होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची ३८३ वी जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यासाठी रविवारी दुपारी १२ वाजता येथील शिवाजी शाळेपासून मोटर सायकल फेरीचे प्रस्थान होणार आहे. या सदभावना फेरीस नगराध्यक्ष रेखा शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक महादेव तांबडे हिरवी झेंडी दाखविणार आहेत.
ही फेरी शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गस्थ होऊन स्थानिक शिवाजी चौकात या फेरीची सांगता होणार आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्सव समितीचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष बाळाभाऊ इन्नाणी राहणार असून प्रमुख वक्ते म्हणून बुलढाणा येथील प्रा अनिल राठोड हे ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व आजचा समाज’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून खासदार भावना गवळी, वाशीम जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषा चौधरी, आमदार लखन मलीक, आमदार सुभाष झनक, माजी आमदार सुभाष ठाकरे, राजेंद्र पाटणी, अ‍ॅॅड. विजय जाधव, सुरेश इंगळे, भीमराव कांबळे, पुरुषोत्तम राजगुरू, पालिकेचे उपाध्यक्ष गंगूभाई बेनिवाले, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक राजू चौधरी, बाजार समितीचे सभापती भागवत कोल्हे, पंचायत समितीचे सभापती तुकाराम काकडे, तालुका खरेदी-विक्रीचे अध्यक्ष पांडूरंग महाले, देखरेख संघाचे अध्यक्ष दामोदर गोटे, मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष अशोक महाले, संभाजी ब्रिगेडचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अनिल पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाराव खडसे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दिलीप सरनाईक, मनसेचे जिल्हाप्रमुख राजू पाटील राजे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष संजीवनी बाजड, कॉंग्रेस महिला आघाडीच्या उपाध्यक्ष डॉ अलका मकासरे, सुनील पाटील, रिपाईचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे, देवा इंगळे, पीरिपाचे जिल्हाध्यक्ष दौलत हिवराळे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे, उपविभागीय अधिकारी रमेश काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदेव आखरे, पालिकेचे मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे, पालिकेच्या सभापती कमल माने, लता उलेमाले, विद्या लाहोटी, मोतीराम तुपसांडे, नगरसेवक राजू वानखेडे, मोहम्मद जावेद आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास शहरातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

No comments: