Sunday, February 19, 2012

बीड शिवजयंती २०१२

बीड जिल्हा शिवमय




युगायुगाच्या अंध रुढीला दृष्टी लाभली भीमामुळे’

प्रतिनिधी । अंबाजोगाई

सुखी संसाराची सोडूनी गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट व ‘युगायुगाच्या अंध रुढीला दृष्टी लाभली भीमामुळे’ यासह जुन्या व नव्या अवीट मराठी गीतांनी आनंद शिंदे यांची मैफल रंगली. रसिकांनीही त्याला भरभरून दाद दिली.

अंबाजोगाई येथे शिवजन्मोत्सवानिमित्त 17 फेब्रुवारी रोजी वेणुताई चव्हाण महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात मराठीतील आघाडीचे व सुप्रसिद्ध गायक आनंद प्रल्हाद शिंदे यांच्या संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले होते. ढोलकी आणि तबल्याच्या जुगलबंदीने कार्यक्रमाला प्रारंभ झाल्यानंतर आनंद शिंदे यांनी वडील दिवंगत गायक प्रल्हाद शिंदे यांच्या आठवणी जागवल्या. या गीताने सुरुवात करून, ‘भीमरायाचा आम्हाला स्वाभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राची शान आहे’. तसेच विठ्ठल उमाप यांच्या ‘भीमाचे नाव विचारा तुम्ही आपल्या अंत:करणाला’, चंद्रकांत निरभवणे यांचे ‘शिवाजी जन्मला, हर हर महादेव बोला’, ‘आंबेडकरने हम दलितोंको इन्सान बनाया’ या गीतांबरोबरा ‘काय सांगू मेरी बरबादी गे; सुन मेरे आमिना दीदी’ या लोकगीताला उपस्थित तरुणांनी उत्स्फूर्त दाद दिली. ‘राजा राणीच्या जोडीला, पाच मजले माडीला; आहे कोणाचे योगदानं, सांगा कोणाचे योगदान लाल दिव्याच्या गाडीला’ या गीतालाही महिला आणि तरुणांनी वन्समोर दिला. मराठी लोकगीते, भीमगीते, शिवमहिना सांगणारी गीते आणि लोकप्रिय गीतांचा अनमोल नजराणा सादर करणार्‍या आनंद शिंदे आणि ग्रुपला रसिकांनी डोक्यावर घेतले. या वेळी सुनीता साळवे आणि बाल गायकांनी लोकप्रिय गीते सादर केली. प्रारंभी वकील संघाचे अध्यक्ष अँड. किशोर गिरवलकर, सरकारी अभियोक्ता ई.व्ही. चौधरी, अँड. खंदारे यांच्यासह विधी आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणार्‍यांचा रणजित लोमटे यांनी सत्कार केला.

अँड. किशोर गिरवलकर म्हणाले ,हा उपक्रम अंबाजोगाईच्या सांस्कृतिक व सामाजिक परंपरेला साजेसा असून रणजित लोमटे आणि त्यांच्या सहकार्‍यांची प्रशंसा केली. जत मनोरजंन आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजनाने शहराच्या सौंदर्यात आणि वैचारिक योगदानात भर घातली आहे, असे ते म्हणाले. शिक्षण विस्तार अधिकारी एस.एस. बगाटे यांनी शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित कविता सादर केली.

No comments: